हिंगणघाटमधील पीडितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

download 1 1

वर्धा (वृत्तसंस्था) हिंगणघाटमधील पीडितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि इतर लोक उपस्थित होते. दरम्यान, नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र गृहमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर तो स्वीकारण्यात आला.

 

हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तिच्या मूळ गावात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ सुरू केला होता. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. तर दुसरीकडे अंत्यसंस्काराआधी नातेवाईकांनी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याआधी मृतदेह स्वीकारण्यासही नकार देण्यात आला होता. मात्र गृहमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर तो स्वीकारण्यात आला.

 

Protected Content