मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील हलखेडा येथे काळी हळदीचा व्हिडीओ दाखवून अहमदनगर येथील तरूणाची फसवणूक केली. तसेच याचा जाब विचारला असता तरूणासह त्याच्या मित्राला बेदम मारहाण करून खिश्यातील तीन हजाराची रोकड व दुचाकी लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, सचिन आप्पासाहेब चंदनसे (वय-२८) रा. वडगाव गुप्ता ता. जि. नगर हा तरूण आपल्या मित्रासह दुचाकी (एमएच १६ सीपी ५९८९) ने मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता आले होते. त्यावेळी राजू शिवाजी (पुर्ण नाव माहित नाही), राजूचे वडील शिवाजी (पुर्ण नाव माहित नाही) आणि अन्य दोन अनोळखी व्यक्ती यांनी सचिन चंदनसे यांना काळी हळदीचा व्हिडीओ दाखवून फसवणूक केली. तसेच तरूणासह त्याच्या मित्राला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून खिश्यातील ३ हजार रूपये, मोबाईल काढून घेतला. आणि मित्राची दुचाकी हिसकावून घेतली. याप्रकरणी तरूणाने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून पोलीसांना घटना कथन केले. याप्रकरणी सचिन चंदनसे यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरूध्द मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माधवराव पाटील करीत आहे.