धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तहसील कार्यालय धरणगाव येथे हर घर झेंडा अभियानाबाबत तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.
या सभेत सर्व शासकीय यंत्रणांनी दि. १३ ते १५ ऑगस्टदरम्यान हर घर झेंडा अभियानास जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याच्या सूचना तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिल्या.
यासोबतच पावर पॉईंटद्वारे स्वस्त धान्य दुकानदारांना प्रशिक्षण देण्यात आले. दुकानदार या अभियानात गावागावात नागरिकांना झेंडा विक्री करणार असल्याची माहिती देवरे यांनी दिली. याप्रसंगी स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम वक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आली.
धरणगाव तालुका मुख्यालयी ७५ फुटी झेंडा उभारण्यात येणार असून, याबाबत सा. बां. विभाग. न. पा. विभागाने संयुक्त पाहणी करून जागा निश्चित करण्याचे निर्देश तहसीलदार यांनी दिले आहेत.
आयोजित करण्यात येणार असून, याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही तहसीलदार देवरे यांनी सर्व उपस्थितांना दिले.
यावेळी गटविकास अधिकारी सुशांत पाटील, उपअधीक्षक भूमी अभिलेख विजय पाटील, निवासी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पाटील, दुय्यम निबंधक विजय राठोड आदी उपस्थित होते.