जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरीविठ्ठल नगरात शिवतेज प्रतिष्ठान आणि जनमत प्रतिष्ठान यांच्यावतीने दिवाळीनिमित्त महापालिकेचे सफाई कर्मचारी यांना मिठाई देण्यात आली.
जळगाव शहरात विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली जाते. याचपध्दतीने शिवतेज प्रतिष्ठान आणि जनमत प्रतिष्ठान यांच्यावतीने वसू बारस आणि दिपावलीच्या निमित्ताने हरीविठ्ठल नगर येथे महापालिकेचे सफाई कर्मचारी यांना मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक दाभाडे, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, सचिव हर्षाली पाटील, आबा माळी, सदस्य नंदू सनान्से, खजिनदार सुरज तडवी, दिनेश खारकर आदी उपस्थित होते.