जळगाव प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मुलगी मिळून न आल्याने मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील हरीविठ्ठल नगरात कोठारी नगरात राहणारे ३५ वर्षीय रिक्षा चालक आपल्या कुटुंबियासोबत राहतात. यावेळी त्याची १६ वर्षाची अल्पवयीन मुलगीही राहते. रविवारी दुपारी ४ वाजता अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आले. मैत्रीणी आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता मुलगी मिळून आली नाही. रविवारी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अल्पवयीन मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि शांताराम पाटील करीत आहे.