यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हरिपुरा या सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित दोन दिवशीय अभ्यासवर्ग शिबीराची सांगता झाली.
भारतीय जनता पार्टी यावल तालुक्याच्या वतीने कार्यकर्ता अभ्यास वर्ग हरीपुरा येथील विज्ञान,अनुसंसाधन केंद्र आश्रम शाळा, हरिभाऊ जावळे नगर बापू मांडे यांची आश्रम शाळा येथे सकाळी आमदार राजूमामा भोळे यांचे शुभास्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.
बुधवारी जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, अजय भोळे, शशिकांत गाजरे, अमित साळुंखे अशोक कांडेलकर,शांताराम आबा पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच गुरुवार रोजी आमदार संजय सावकारे,पोपट तात्या भोळे,उदय भालेराव, जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती रवीन्द्र ( उर्फ छोटु ) पाटील ,माजी आमदार श्रीमती.स्मिताताई वाघ, खासदार उन्मेश दादा पाटील, यांचे मार्गदर्शन लाभले.
तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख,बूथ प्रमुख व सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी आपली दर्शविली हे दोन दिवसीय मार्गदर्शन शिबीर यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, तालुका सरचिटणीस उज्जैन सिंग राजपूत, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरुण कोळी, भाजप युवा मोर्चा तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.