जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरातील माहेर असलेल्या २१ वर्षीय विवाहितेला कृषि दुकान टाकण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे या मागणीसाठी पतीसह सासरच्या मंडळींनी छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात माहेर असलेल्या श्वेता गोविंदा पाटील यांचा विवाह यावल तालुक्यातील नावरे येथील गोविंदा दत्तात्रय पाटील यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे एक वर्षांपर्यंत विवाहितेला चांगली वागणूक दिली. त्यानंतर पती गोविंदा पाटील हा दारू पिऊन विवाहितेला मारहाण करत होता. त्यानंतर त्याने कृषि दुकान टाकण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणण्याची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला त्रास देणे सुरू केले. तसेच सासू, सासरे, ननंद यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. हा छळ व त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता विवाहितेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. विवाहितेच्या फिर्यादीवरून पती गोविंदा दत्तात्रय पाटील, सासू रत्ना दत्तात्रय पाटील, सासरे दत्तात्रय दौलत पाटील सर्व रा. नावरे ता. यावल ननंद सुनिता उदय पाटील रा. कल्याणे होळ ता.जळगाव, नणंद जागृती पाटील रा. पाचोरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल पाटील करीत आहे.