स्व.संध्याताई मयूर यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

 

चोपडा, प्रतिनिधी । येथील चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या माजी सचिव स्व. संध्याताई मयूर यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित दोन गटात घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत प्रथम गटात दर्शना साळी, द्वितीय गटात सुयश ठाकूर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

संस्थेच्या अध्यापक विद्यालय व शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रातर्फे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोविड-१९ ची परिस्थिती लक्षात घेऊन स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. या स्पर्धेत स्पर्धकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला होता. आज दि ११ सप्टेंबर रोजी संस्थेच्या माजी सचिव स्व. संध्याताई मयूर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण संजय बारी यांनी केले. स्पर्धेत दोन गट होते त्याचा निकाल पुढीलप्रमाणे

प्रथम गट : प्रथम – दर्शना गोपाल साळी, द्वितीय – वैष्णवी प्रकाश जोशी, तृतीय – भाग्यश्री सतीश बोरसे, द्वितीय गट/खुला गट प्रथम-सुयश भिकन ठाकूर, द्वितीय – प्रतीक्षा रामदास बाविस्कर तृतीय – उज्ज्वला लीलाधर धनगर स्थान मिळविले आहे.

या सर्व यशस्वी व सहभागी स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष व्ही. सी .गुजराथी, उपाध्यक्ष मोरेश्वर देसाई, चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरी मयूर,संचालक चंद्रहास गुजराथी,सर्व संचालक पदाधिकारी,समन्वयक गोविंद गुजराथी,प्राचार्य योगिता बोरसे ,केंद्र संयोजक किरण पाटील, परीक्षक संजय बारी तसेच सर्व अध्यापकाचार्य यांच्यातर्फे विजेत्यांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले. .

Protected Content