कासोदा, प्रतिनिधी | येथील युवासेनेच्या वतीने गुरुवार दि.२३ जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून गावातील सर्वच शाळेंमध्ये जनरल नॉलेज परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस इयत्ता ५वी ते १२ वी पर्यंतचे एकूण ५२८ विद्यार्थी व विद्यार्थिनीं सहभाग घेतला.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त जनरल नॉलेज परीक्षेसाठी निवड समिती नेमण्यात आली असून शिस्तबद्ध पद्धतीने ही परीक्षा शांततेत पार पडली. जनरल नॉलेज परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २६ जानेवारी रोजी ग्राम पंचायत येथे सर्व उपस्थित्यांच्या समोर सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कासोदा युवासेना उपशहर प्रमुख अमोल भोई , जयेश पिलोरे , प्रमोद चौधरी, सुनिल चौधरी, अजय पाटील, साजिद शेख, कल्पेश चिंचोले ( वाणी ), गणेश पाटील तसेच सर्वच शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी मेहनत घेतली.