स्व.डॉ. तेजपाल चौधरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय व्याख्यानमालेचा समारोप

जळगाव, प्रतिनिधी  । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या हिंदी विभागाच्यावतीने आयोजित स्व.डॉ. तेजपाल चौधरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑनलाईन राष्ट्रीय व्याख्यानमालेचा आज समारोप झाला. 

 

प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार, केंद्रीय हिंदी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अनीलकुमार शर्मा, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा.योगेश पाटील, समीक्षक डॉ. दिनेश चौबे, विभाग प्रमुख डॉ.सुनील कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. चौबे यांनी भारतीय संदर्भात तुलानात्मक साहित्य यावर भाष्य केले. तुलनात्मक साहित्य हे भारतीय अस्मितेला जीवंत ठेवते. नवीन संदर्भ आणि नवीन रूप यांची सांगड घालून तुलनात्मक साहित्य नवीन संदर्भांना जन्म देते. असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. अनीलकुमार शर्मा म्हणाले की, डॉ.तेजपाल चौधरी यांनी भाषेचा सेतु म्हणून काम केले. दिलीप पाटील यांनी आपल्या भाषणात डॉ.तेजपाल चौधरी यांच्या साहित्याची स्तुती करतांना डॉ. चौधरी यांनी प्रखर राष्ट्रभक्ती जागृत केली. असे मत व्यक्त केले. प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार यांनी विद्यापीठाच्या भाषा प्रशाळेचा पाया रचन्यात डॉ.तेजपाल चौधरी यांचे मोलाचे योगदान होते असे सांगीतले. डॉ. रोहिदास गवारे व डॉ.प्रिती सोनी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. उर्मिला पाटील व पुजा निचोळे यांनी आभार मानले.

 

Protected Content