जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान मंडळाच्या युजी नीट संदर्भात डॉ.ललित पाटील यांचाकडून मार्गदर्शन केले.
नीट परीक्षेत येणाऱ्या अडचणी तसेच वैद्यकीय महाविद्यालयविषयी माहिती दिली डॉ. ललित पाटील यांनी यावेळी वाढत्या स्पर्धेचे महत्व याविषयाची दखल घेत विद्यार्थ्यांनी आपला वेळ वाया न घालवता अभ्यास करावा तसेच त्यासाठी त्यांनी विविध उदाहराणांचे दाखले दिले.
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, प्राव्हेट मेडिकल कॉलेज तसेच मेडिकल एज्युकेशन इन अब्रॉड याविषयावरही सखोल मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा. आर.बी.ठाकरे, समन्वयक प्रा.उमेश पाटील, व विज्ञान मंडळ प्रमुख प्रा. संदीप वानखेडे उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार प्रा. किरण महाजन यांनी केले. कार्यक्रमाचा यशस्वी साठी प्रा. शिल्पा सरोदे प्रा. दिनेश महाजन,प्रा. महेंद्र राठोड,प्रा. स्वप्ना पाटील आदिनी परिश्रम घेतले.