जळगाव प्रतिनिधी । येथील दुरदर्शन टॉवरजवळील स्वामी मंदीरात बुधवार ५ फेब्रु रोजी दु.४ वा३० मी जया एकादशीनिमीत्त संत्संग सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेत सदगुरू शास्त्री पुरूषोत्तम प्रकाशदासजी पी पी स्वामी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या संत्सगात जया एकादशीचे महत्व, मानवी जिवनास होणारे फायदे, ब्रम्ह हत्या, पापापासून सुटका व मोक्ष प्राप्ती, भुत पिशाच्च पासून मुक्ती, स्वर्गलोकाची प्राप्ती, घरात सुख, शांती, अश्वमेध यज्ञाचे फळ अशा सर्व समस्यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. याचबरोबर ४. ३० ते ६.३० धुन, भजन, प्रवचन त्यानंतर आरती व फराळ वाटप केले जाणार आहे. जळगाव भुसावळ महामार्गावरील दुरदर्शन टॉवर शेजारी दु ४ वा ३० मि. हा कार्यक्रम होणार आहे.तरी जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्याव असे आवाहन स्वामीनारायण संत्सग मंडळातर्फे करण्यात आले आहे.