स्वातंत्र्यवीर सावरकर काळाच्या पलीकडे पाहणारे क्रांतदर्शी देशप्रेमी – ॲड. अत्रे

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्यवीर सावरकर काळाच्या पलीकडे पाहणारे क्रांतदर्शी देशप्रेमी होते म्हणून कलावंताने चित्रात त्यांचे डोळे न दाखवण्याचा सृजनात्मक डोळसपणा दाखविला, असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध वकील ॲड.सुशीलकुमार अत्रे यांनी काढले.

 

पु.ना.गाडगीळ कलादालनात सावरकरांच्या पुण्यतिथीच्या औचित्याने दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाचोरा येथील सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय भडगावचे  कलाशिक्षक योगेंद्र पाटील यांच्या अविश्वसनीय सावरकर या चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना अत्रे बोलत होते.कार्यक्रमास प्रमुख अतिथी चित्रकर्ती प्रा. अंजली गवळी, कलाअभ्यासक ललित कला केंद्र,चोपडा येथील प्राचार्य राजेंद्र महाजन, पू.ना.गाडगीळ ज्वेलर्सचे व्यवस्थापक संदिप पोतदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हाध्यक्ष डॉ. निलेश पाटील, श्रेयस मेडिकल फाउंडेशन अध्यक्ष डॉ. जयवंतराव पाटील, मातोश्री सुमित्राबाई पाटील, सुमनताई गिरधर हायस्कूल भडगाव माजी प्राचार्य सुनिल पाटील, ज्येष्ठ पत्रकार दिनेश दगडकर, मनोज महाजन, जयश्री पाटील, सावरकर मित्रमेळा अध्यक्ष सुभाष शौचे, सचिव संजय भावसार, चित्रकार राजू बाविस्कर, नगरसेवक राजू मराठे, किशोर वाघ, चित्रकार योगेश सुतार, कलाशिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष निलेश चौधरी, सचिव अरुण सपकाळे आदी उपस्थित होते.

पुढील मार्गदर्शनात अत्रे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जाज्वल्य देशप्रेम, प्रखर हिंदुनिष्ठा व अदम्य साहस चित्रकार योगेंद्र पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे चित्रांकीत केल्याबद्दल गौरवोद्गार काढले. गुरुवर्या अंजली गवळी यांनी सावरकरांच्या जीवनावरील चित्रे प्रेरणादायी व मंत्रमुग्ध करणारे आहेत अशी प्रशंसा केली. प्राचार्य राजेंद्र महाजन मार्गदर्शनात म्हणाले की, कलावंताइतकेच कलारसिकांना चित्र बघणे, अनुभवणे व समृद्ध होणे यासाठी चित्र प्रदर्शने महत्त्वाची आहेत. स्वातंत्र्यवीरांची जहाल देशनिष्ठा दर्शवणारी योगेंद्र पाटलांची रेषा अतिशय प्रगल्भ आहे. योगेंद्र पाटील यांनी सावरकरांच्या जन्मभूमी भगूरला पहिले प्रदर्शन भरविले.यानंतर सावरकर स्मारक दादर, सेल्युलर जेल, अंदमान,लंडन येथे सावरकरांच्या पदस्पर्शाने पुनित वास्तव्या ठिकाणी प्रदर्शन आयोजित करण्याचे भविष्यातील नियोजन प्राचार्य महाजनांनी सांगितले.प्रारंभी
प्रस्तावनेत कलाशिक्षक शिक्षक योगेंद्र पाटील यांनी सावरकांच्या चरित्र वाचनाने झपाटलो . माझ्या भरकटलेल्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून जीवनाला उदात्त ध्येय मिळाल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित कला केंद्र चोपडा येथील प्रा.संजय नेवे व आभार प्रदर्शन साक्षी पाटील यांनी केले.
प्रदर्शनास चित्रकार तरुण भाटे, भिका पाटील, राजू बाविस्कर, कलाग्रामचे संचालक शाम कुमावत, योजना चौधरी, जितेंद्र चौधरी, किरण बडगुजर, अशोक पाटील, ए .बी. पाटील, भारतरत्न.डॉ. ए .पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे, राजू साळी (मुक्ताईनगर ), वसंत पाटील (पाचोरा ) यांचेसह जिल्हयातील अनेक प्रथितयश कलावंत बहुसंखेने उपस्थित होते. कोविड निर्बंध शिथील झाल्यानंतर सदरहू पहिलेच प्रदर्शन असल्याने सावरकर प्रेमी व कलारसिकांनी उदंड प्रतिसाद देत प्रदर्शनाचा लाभ घेतला.सदरहू प्रदर्शन दिनांक २८ तारखेपर्यंत रसिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

Protected Content