स्वतःची भूमिका असणारा कवी श्रोत्यांच्या मनात घर करतो : डॉ. अग्रवाल

जळगाव, प्रतिनिधी । मंचावरून कविता सादर करणाऱ्या कवींची स्वत:ची एक भूमिका असली तर तो कवी श्रोत्यांच्या मनात घर करून राहतो असे प्रतिपादन सुप्रसिध्द हिंदी साहित्यिक डॉ.घन:श्याम अग्रवाल यांनी केले. 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या हिंदी विभागाच्यावतीने आयोजित स्व. डॉ.तेजपाल चौधरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑनलाईन राष्ट्रीय व्याख्यानमालेचे सहावे पुष्प गुंफतांना डॉ.घन:श्याम अग्रवाल बोलत होते. यावेळी डॉ. रोशनी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.तेजपाल चौधरी यांचे साहित्य सर्वग्राही, मार्मिक मात्र व्यंगात्मक असे होते. डॉ. चौधरी हे मंचीय कवी होते. यावेळी डॉ.रोशनी पवार यांनी खरा साहित्यकार आपल्या दु:खा सोबत इतरांचे दु:ख आणि वेदना आपल्या सामावून घेण्याची क्षमता ठेवतो मात्र समोरच्याला साहित्यातून आनंद देत असतो असे मत व्यक्त केले. सुत्रसंचालन डॉ.विजयप्रकश शर्मा यांनी केले. वंदना पवार यांनी आभार मानले. या व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प डॉ.भारती गोरे यांनी विणले. डॉ.उषा शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. गोरे यांनी प्राचिनकाळा पासून आजवर लिहिल्या गेलेल्या कवितांच्या माध्यमातून स्त्रीयांचे अस्तित्व या विषयी भूमिका मांडली.  वैशाली घोडे यांनी आभार मानले.

Protected Content