अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माजी राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्षा आमदार बच्चू कडून यांनी दिव्यांगाचे स्वतंत्र मंत्रालयाची मागणी केली होती. राज्य शासनाने दिव्यांग बांधवासाठी स्वतंत्र मंत्रालयाला मंजूरी दिली. या निर्णयाचे अमळनेर शहरात शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी अमळनेर प्रहार संघटनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला.
राज्य शासनाकडून या निर्णयाला मंजूरी मिळाल्यानंतर प्रहार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दादा भुसे यांचे आभार व्यक्त केले. दिव्यांग बांधवांना खऱ्या अर्थाने या मंत्रालयाच्या माध्यमातून न्याय मिळणार आहे. दरम्यान, स्वतंत्र मंत्रालयाचा मंजूरी मिळाल्यानंतर अमळनेर प्रहार संघटनेसह इतर विविध संघटनेतर्फे फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.
या निर्णयाची अधिकृत घोषणा ३ डिसेंबर २०२२ जागतिक अपंग दिनी होणार असल्याने या निर्णयाचे स्वागतासाठी अमळनेर शहरात प्रहार अपंग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने ढोल ताश्यांच्या गजरात, फटाके फोडून , पेढे वाटप करून भव्य आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी प्रहार अपंग क्रांती संस्थेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार , जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष गुलाब पाटील, प्रदिप सोनवणे, रविंद्र पाटील, दिनेश पाटील, भैय्या पाटील, नूरखान पठाण, प्रविण पाटील, ललिता पाटील, जितेंद्र पाटील, गणेश पाटील, रंजू जैन, योगेश पाटील, हेमंत महाजन, हरिप्रसाद कापडे, अशोक न्हावी, अश्विनी पाटील, श्याम धनगर, संघटनेचे व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.