चोपडा प्रतिनिधी । स्रियांचा सन्मान हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नितीतत्व राष्ट्रनिर्मितीस प्रेरक ठरणारे असल्याचे प्रतिपादन मंगेश बाविस्कर यांनी केले. ते येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविदयालयातील इतिहास विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविदयालयातील इतिहास विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले तसेच आकाश कोळी या विद्यार्थ्याने शिवरायांच्या जीवनावरील बहारदार पोवाड्याचे सादरीकरण केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी या कार्यक्रमाचे वक्ते श्री.मंगेश बाविस्कर, उपप्राचार्य डॉ.व्ही.टी.पाटील,.एन.एस.कोल्हे, डॉ.के.एन.सोनवणे,
बी.एस.हळपे, पर्यवेक्षक व्ही.वाय.पाटील, रजिस्ट्रार डी.एम.पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख सौ.एस.बी.पाटील यांनी केले तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय भूषण.बी.पवार यांनी करून दिला. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र ग्रंथाचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक मंगेश बाविस्कर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील प्रत्येक शब्द लोककल्याणाची तळमळ व्यक्त करणारा आहे. संत तुकारामांच्या क्रांतिकारी प्रबोधनवादी विचारांची प्रेरणा घेऊन समाज्याची उत्तमरित्या जडणघडण करण्याचे काम केले. योग्य नियोजन, दृढ विश्वास व रणनीती यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूवर सहजपणे विजय मिळविला. शेतकर्यांची आस्थेने विचारपूस करणे, रयतेचे प्रश्न सोडविणे, सर्व धर्मांचा सन्मान करणे, स्रियांचा आदर करणे या सर्व विधायक कामांमुळे जनतेने त्यांना दिलेले ङ्गरयतेचा राजाफ हे नामभिधान शोभून दिसते. त्याचप्रमाणे स्रियांचा सन्मान करणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नितीतत्व राष्ट्राने अवलंबल्यास ते राष्ट्रनिर्मितीस प्रेरक ठरेल. याप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मापासूनचा संपूर्ण चित्रमय इतिहास पीपीटीद्वारे पुरावे सादर करून जीवंत प्रसंग उभे केले.
या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ. ए.एल.चौधरी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल असा आहे. आभारए.एस.साळुंखे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.आर.आर.पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य एम.बी.पाटील, डी.डी.कर्दपवार,वाय.एन.पाटील, व्ही.बी.पाटील, संगीता पाटील, व्ही.जी.सोनवणे, एम.एल.भुसारे, मयूर पाटील, जितेंद्र पाटील, डी.डी.करंकाळ,एन.बी.पाटील, डॉ. सदाफुले, डॉ.गोपाल पाटील, विशाल बोरसे यांनी परिश्रम घेतले.