जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिकेचा २०२०-२१ या वर्षाच्या अंदाजपत्रकाला आज महापालिकेच्या ऑनलाईन महासभेत मंजूरी देण्यात आली.
सुरवातीला २०२०-२१ या महापालिकेची आर्थिक अंदाजपत्र हे ११४१ कोटी ९६ लाखाचे प्रशासनाचे अंदाजपत्रक होते. आता नव्याने १६० कोटीची वाढ स्थायी समितीच्या वतीने करण्यात येवून १३०१. ९६ कोटीचे अंदाजपत्र स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा यांनी महासभेपुढे सादर केले. त्यावर चर्चा झाली.
चर्चेत नितीन लढ्ढा, कैलास सोनवणे, सुनील महाजन, विशाल त्रिपाठी, ज्योती चव्हाण यांनी विविध मुद्दे मांडले. आयुक्त कुलकर्णी यांनी अंदाजपत्रक सदस्यांनी अभ्यास करून व विकासाच्या दृष्टीने योग्य असल्याचे मत व्यक्त केले. यानंतर महासभेत अंदाजपत्रकाला सर्वानूमती मंजूरी देण्यात आली.
सभेत संसर्ग जन्य प्रतिबांधात्मक उपायोजनांसाठी आधी पाच लाखाची तरतुद होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ही तरतुद पाच कोटी करण्यात आली.
जळगाव महापालिकेची पहिली ऑनलाईन महासभा आज . सकाळी साडेअकराला महापौर भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर उपहापौर डॉ. अश्विन सोनवणे, आयुक्त सतिष कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. अंदाजपत्रकात उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाला सूचनाही करण्यात आलाय आहेत.
सुचनांचे अमंलबजावणी करून मालमत्ताकरात वाढेल, नगरविकास विभागात उत्पन्न वाढीसाठी सुचविलेले बदलातून उत्पन्न वाढ होईल, अनधिकृत गुंठेवारी, ले- आऊट धारकांना फि आकारणीतून उत्पन्न वाढ, प्रशासनाने हॉकर्स फी २० रुपयावरून ५० रुपये करण्याचा अंदाजपत्रातील प्रस्ताव अमान्य करण्यात आला.
या चर्चेत नितीन लढ्ढा म्हणाले कि, ५० टक्के सुट दिल्यास विकास कामांवर निर्बंध येतील, त्यामुळे अंदाजपत्रकात फेरदुरुस्ती करावी लागले. उपमहापौर सोनवणे म्हणाले, की शासनाने अनुदान दिले तर सुट मिळेल. यावर आयुक्त कुलकर्णी म्हणाले, की मनपाचा जमा व खर्चाचे अंदाजपत्रक स्थायी सभापतींनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहे. सुधारित नवे अंदाजपत्रक करण्याचे विचार करता येईल. पुढच्या सभेत परिणामाची चर्चा करावी. शहरातील घरपट्टी वसुली अनेकदा प्रयत्न करूनही ५४ टक्कयांच्या वर गेलेली नाही, याकडे यावेळी नितीन लढ्ढा यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3162219213854135/