भुसावळ प्रतिनिधी । अनुसुचीत जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची समस्या सोडविण्यासं युपी सरकारचा निषेध करण्यासाठी येथे काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले.
जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाद्वारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील एस.सी. प्रवर्गातील सुमारे २४८४ विद्यार्थ्यांची स्काँलरशिप रद्द करुन त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवून प्रवेश नाकारल्याच्या विषया संदर्भात निवेदन देण्यात आले.
दरम्यान, यासोबत उत्तर प्रदेशातील बांसा जि.आझमगढ येथील सत्यमेव जयते या दलित सरपंचाची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याची दखल अखिल भारतीय काँग्रेस अनु जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी घेतली.त्याकरीता ते सदर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी जात असतांना त्यांना तेथील पोलिस प्रशासनाकडून आझमगढ जिल्ह्याच्या सिमेवर अडवून ताब्यात घेण्यात आले.त्यामुळे उत्तर प्रदेशातील जातीयवादी योगी सरकारच्या निषेधार्थ भुसावळ येथीलतहसिलदार साहेबांशी चर्चा करुन व निवेदन देण्यात आले.
यावेळी जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी, इस्माईल गवळी, गफूर गवळी, अॅड. शरद तायडे, अँड.रम्मू पटेल हे उपस्थित होते.