सोहम् योग अॅण्ड नॅचरोपॅथी द्वारा एक दिवसीय शिबीर उत्साहात संपन्न

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  मू. जे.महाविद्यालय संचालित  सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी आणि ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववी आणि दहावी स्काऊटच्या  विद्यार्थ्यांसाठी एक  शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले आहे.

 

स्काऊटच्या  विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिबिरात ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रा. अनंत महाजन आणि प्रा. सोनल महाजन यांनी शिबिराची सुरुवात सकाळी ६ वाजता योगाभ्यासाने केली. शारीरिक क्षमतेचा विकास तसेच अभ्यासातील एकाग्रता वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक आसने प्राणायामाचा अभ्यास मोकळ्या मैदानात झाडांच्या सावलीत या प्रथम सत्रात घेण्यात आला.  योगाभ्यासानंतर सकाळी शिबिराचे उद्घाटन ओंकार प्रतिमेचे आणि लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले. याप्रसंगी ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीचे संचालक डॉ. देवानंद सोनार, सोहम निसर्गोपचार विभागाचे समन्वयक प्रा. सोनल महाजन तसेच या कार्यशाळेचे समन्वयक प्रा.अनंत महाजन   त्याचबरोबर ए. टी. झांबरे विद्यालयाचे पर्यवेक्षक नरेंद्र पालवे, स्काऊट मास्टर सतीश भोळे, स्काऊट मास्टर ए. एन. पाटील व शिक्षक वृंद उपस्थित होते.     शिबिरात त्यानंतर प्रा. सोनल महाजन यांनी  “नैसर्गिक पौष्टिक आहाराचे सुदृढ आरोग्या करिता महत्त्व “याविषयीचे मार्गदर्शन करून त्यांच्याशी मोकळा संवाद साधला. त्यानंतर डॉ. देवानंद सोनार यांनी मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचे सत्र घेऊन त्याचे महत्त्व पटवून दिले. दुपारच्या सत्रात प्रा. अनंत महाजन यांनी कुमार अवस्थेतील शारीरिक मानसिक परिवर्तन आणि आरोग्य याविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांशी मुक्त चर्चा केली. शिबिरात स्काऊट च्या प्रार्थना विविध प्रकारची गाणी आणि  स्काऊट चे प्रशिक्षण मुलांना देण्यात आले. तसेच रात्री शेकोटीच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कला गुण सादर केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड  नॅचरोपेथीच्या समन्वयिका प्रा. सोनल महाजन,प्रा. अनंत महाजन, संचालक डॉ. देवानंद सोनार ,प्रा. पंकज खाजबागे सौ. माधवी  तायडे, विकास खैरनार तसेच ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रणिता झांबरे,  तसेच प्रा.आर.एन.तडवी, प्रा. ए. पी. पाचपांडे, प्रा.पराग राणे, प्रा. व्ही. एस. गाडगे आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content