मुंबई प्रतिनिधी । राजकीय पक्षांबाबत सोशल मीडियावर व्यक्त होणार्या प्रतिक्रिया रोखणे अशक्य असल्याचे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात व्यक्त केले.
सोशल मीडियातील राजकीय प्रतिक्रिया हा चिंतेचा विषय बनला आहे. यावरून अनेकदा गैरप्रकारदेखील घडले आहेत. या अनुषंगाने अॅड. सागर सूर्यवंशी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये मतदानाच्या ४८ तास आधी कोणत्याही व्यक्तीस एखाद्या राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात सोशल मीडियावर मत व्यक्त करण्यास निर्बंध घालण्याचे निर्देश न्यायालयाने निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावरील सुनावणीमध्ये याचिकाकर्त्यांचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी अमेरिका, ब्रिटनमध्ये निवडणुकीच्या वेळी सोशल मीडियावर असा मजकूर प्रकाशित करण्यास बंदी असते, भारतातही तसा नियम लागू करायला हवा असा युक्तीवाद केला. यावर निवडणूक आयुक्तांच्यावतीने अॅड. राजदीप राजगोपाल म्हणाले, मजर एखादी व्यक्ती एखाद्या राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात सोशल मीडियावर मत व्यक्त करत असेल तर त्याला निवडणूक आयोग प्रतिबंध घालू शकणार नाही.