भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी साखरपुडा झालेल्या तरुणीचे लग्न होऊ नये, या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने इंस्टाग्राम या सोशल मिडीयावर तरुणीचे फोटो ठेवू असलेल कमेंट करत केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या तरुणीचे नुकतेच साखरपुडा झाला आहे. काही दिवसानंतर तिचा लग्न देखील होणार आहे. दरम्यान तिचे लग्न होऊ नये, या उद्देशाने एका अज्ञात व्यक्तीने इंस्टाग्राम खात्यावरून तरूणीचे दाजी सोबत असलेला फोटो ठेवून तिच्याशी लग्न करु नये, तुमची फसवणूक होईल, असे बदनामीकारक मेसेज टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीच्या भावाने लागलीच जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून बुधवारी १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात इंस्टाग्राम खातेदारावर जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.