सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्या १० जणांवर गुन्हे

जळगाव प्रतिनिधी । राज्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र असे असतांना जिल्ह्यात बऱ्याच भागातील नागरीकांनी येण्याजाण्याचा सार्वजनिक रस्ता स्वत: बंद करून अडथळे करणे आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार २१ दिवसांचा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातही यांची अंमलबजावणी करण्यात आली असतांना शहरात आणि जिल्ह्यातील काही तरूणांनी व नागरीकांनी कोणतीही परवागनी न घेता सार्वजनिक रस्ता बंद करून अडथळा निर्माण केला आहे. सोबत काही टवाळखोर तरूणांली सोशल मीडिया जसे फेसबुक, व्हाटसअँपव्दारे कोरोना रोगाच्या अनुषंगाने दोन धर्मात, दोन जातीत तेढ, तिरस्कार निर्माण होईल असे संदेश प्रसारित करीत होते अश्या १० जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात वेगवेगळे १० गुन्हे याप्रकरणे
(१) जळगाव तालुका पोलीस स्टेशन भाग -५ गुरन.५७/२०२० भादवि.क.१५३ (अ),२९५(अ),५०५(२) सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ कलम ५२
(२) पाचोरा पोलीस स्टेशन भाग -५ गुरन.१३८/२०२० भादवि.क. २९५(अ),माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७
(३) चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशन भाग -५ गुरन.२४/२०२० भादवि.क.१५३ (अ),२९५(अ),५०५(२) सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ कलम ५२
(४) जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन भाग-५ गुरन.३३०/२०२० भादवि.क.१८८, ५०५(ब), ५०५(क)
(५) भुसावळ शहर पोलीस स्टेशन भाग -५ गुरन.१५६/२०२० भादवि.क.५०५(२),१८८
(६) जळगाव शहर पोलीस स्टेशन भाग -६ गुरन.३०६५/२०२० भादवि.क.५०५(२)
(७) रामानंदनगर पोलीस स्टेशन भाग -६ गुरन.३०६५/२०२० भादवि.क.५०५(२)
(८) निभोंरा पोलीस स्टेशन भाग -६ गुरन.०९/२०२० भादवि.क.५०५(२)
(९) अमळनेर पोलीस स्टेशन भाग – ६ गुरन.१९५/२०२० भादवि.क.१८८,५०५(१)(क),साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम २,३,४
(१०) शनिपेठ पोलीस स्टेशन भाग-०५ गुरन.२२/२०२० भादवि.क.१५३ (अ),२९५(अ),५०५ सह महाराष्ट्र व्यवस्थापन कायदा सन – २००५ चे कलम – ५२ प्रमाणे

Protected Content