जळगाव, प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्ताने रेल्वे स्टेशन जवळील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण सोशल डिस्टन्स पळून अभिवादन करण्यात आले.
देशात व राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी न करता काही मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. याप्रसंगी महापौर भारतीताई सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, एसपी पंजाबराव उगले, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी व आदी अधिकारी उपस्थित होते. त्यांच्यासोबत विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी अभिवादन केले.