Home Cities जळगाव सोलर पॅनल, ट्रान्सफॉर्मर व ओपन जिम साहित्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते...

सोलर पॅनल, ट्रान्सफॉर्मर व ओपन जिम साहित्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण


 

 

जळगाव : प्रतिनिधी । ‘आश्रय-माझे घर या संस्थेला मिळालेल्या सोलर पॅनल, व मातोश्री आनंदाश्रमात प्राप्त झालेल्या ओपन जिम साहित्य आणि ट्रान्सफॉर्मरचे  लोकार्पण आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होत  आहे.

 

प्रौढ मतिमंद, गतिमंद आणि विकलांग मुलांचे आजीवन संगोपन करण्यासह त्यांना आत्मनिर्भर करणारी ‘आश्रय-माझे घर’ ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेला देणगी स्वरुपात मिळालेल्या सोलर पॅनल, व मातोश्री आनंदाश्रमात जिल्हा नियोजन व विकास निधीतून प्राप्त झालेल्या ओपन जिम साहित्य आणि ट्रान्सफॉर्मर यांचा लोकार्पण सोहळा  आज  शांतीवन परिसर, गिरणा पंपिंग रोड, मातोश्री आनंदाश्रम शेजारी, सावखेडा शिवार येथे होत  आहे.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडत आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती सुशिल असोपा यांची उपस्थिती असेल. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन डॉ. प्रताप जाधव, सौ अनिता कांकरिया व आश्रय माझे घर’ आणि मातोश्री आनंदाश्रमच्या सर्व संचालक मंडळाने केले आहे.

 


Protected Content

Play sound