सोयगाव महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्यपदी डॉ.अंभोरे

सोयगाव प्रतिनिधी। येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ.शिवाजी अंभोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ.शिवाजी अंभोरे हे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते.नुकताच त्यांनी कार्यभार स्वीकारला.यावेळी त्यांचा अनेक चाहत्यांनी सत्कार करून अभिनंदन केले. उपप्राचार्य डॉ.शिरीष पवार , अधीक्षक पंकज साबळे , डॉ.निलेश गाडेकर , सीताराम सुरसे , शंकर काळे , राहुल चौधरी , उदय सोनवणे , कमलेश काळे , भरत औरंगे , सुनील वाघ , सलीम तडवी , ग्रंथपाल निर्मला बोराडे ,राजेंद्र राठोड , दीपक पगारे आदी उपस्थित होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ काळे, सचिव प्रकाश काळे यांनी डॉ.अंभोरे यांचा सत्कार केला आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Protected Content