जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत ११ मार्च रोजी रात्री ८ ते १५ मार्च सकाळी ८ पर्यंत जनता कर्फ्यु जाहीर केल्यामुळे या कालावधीत विद्यापीठ बंद राहणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जळगाव शहर महानगर पालिका हद्दीतील शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, परिसंस्था व विद्यापीठ १५ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहतील असे कळविण्यात आले आहे. त्यानुसार विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. बी. व्ही. पवार यांनी परिपत्रक प्रसिध्द केले आहे. जनता कर्फ्युच्या काळात पुर्व नियोजित परीक्षांचे ऑनलाईन, आफॅलाईन कामकाजाची कार्यवाही सुरू राहील. संबंधीत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत परीक्षेच्या कामासाठी उपस्थित रहावे असेही आवाहन परीपात्राद्वारे करण्यात आले आहे.