जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – सोमवारपासून सरकारी बँक, महावितरणसह अन्य क्षेत्रातील सर्वच कर्मचारी वर्गाने असहकार पुकारला असून खाजगीकरण, कंत्राटीकरणाविरुद्ध तसेच अन्य न्याय्य मागण्यासाठी सर्वच कर्मचाऱ्यानी संपाचे हत्यार उपसले आहे.
सरकारी क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्याच्या विविध संघटनांनी २८ आणि २९ मार्च असे दोन दिवसीय संप पुकारला आहे. या संपामुळे बँकाच्या कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. या संपात स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक असो., ऑल इंडिया बँक एम्प्लोंइज असो., ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असो., या सर्व संघटनानी केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक खाजगीकरण धोरणविरोधात संप पुकारला आहे.
महावितरण कर्मचारी संघटनांनी देखील सहकारी उद्योगांचे खाजगीकरण, कंत्राटीकरणाविरोधात २८ मार्च पासून संप पुकारला आहे. तर दुसरीकडे गेल्या पाच महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्याचा संप सुरु असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णता कोलमडली आहे. या संपापाठोपाठ बँक आणि महावितरण आणि अन्य कर्मचारी संघटना संपावर गेल्यास सर्व सार्वजनिक सेवावर परिणाम होण्याची शक्यता आहे.