मुंबई प्रतिनिधी | आपल्याला ईडीने चौकशीसाठी बोलावले तर स्वत: जाऊ, मात्र किरीट सोमय्या यांना ईडीने प्रवक्ते म्हणून नेमले आहे का ? असा प्रश्न मंत्री नवाब मलीक यांनी उपस्थित केला आहे.
आज नवाब मलीक यांनी सूचकपणे आपल्यावर केंद्रीय पथकाची कारवाई होणार असल्याचे ट्विट केले. यानंतर किरीट सोमय्या यांनी मलीक यांनी वक्फ बोर्डाच्या जमीनी हडप केल्याने त्यांच्यावर कारवाई होणारच असल्याचे सांगितले. यावरच आता मलीक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वक्फ प्रकरणी ईडी माझ्या घरी येणार असे किरिट सोमय्या यांनी म्हटले. एऊ ने किरीट सोमय्या ना अधिकृत प्रवक्ता केलं का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. ईडीने बोलावल्यास मी स्वत: त्यांच्या कार्यालयात जाणार आहे असे मलिक यांनी स्पष्ट केले. ईडीने अधिकृत माहिती द्यावी, मीडियात बातम्या पेरून राज्याला बदनाम करण्याचे काम बंद करावे असेही मलिक यांनी म्हटले.
नवाब मलिक यांनी वक्फ जमीन घोटाळ्याबाबतही भाष्य केले. पुणे वक्फ प्रकरणात ईडीने तपास केला. वक्फ बोर्डाच्या सात कार्यालयात छापे टाकले. ईडीने वक्फच्या एका अधिकार्याला दोन दिवस बोलावले आणि चुकीच्या पद्धतीने एफआयआर दाखल केला असल्याचे मलिक यांनी म्हटले.