सोपोरमध्ये दहशतवादी हल्ला ; दोन जवान शहीद

 

 

श्रीनगर : वृत्तसंस्था । काश्मीरमधील सोपोर येथील अरमपोरा नाका येथे आज दहशतवादी हल्ला झाला यात दोन जवान शहीद झाले , दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

 

अन्य दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. लष्कर ए तोयबाने हा दहशतवादी हल्ला घडवला असल्याची माहिती काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिली आहे.

 

अरमपोरा नाक्यावरील तैनात असलेल्या जवानांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात स्थानिक दोन नागरिकांना देखील जीव गमावावा लागला आहे.  पोलिसांच्या वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. हल्ला केल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून फरार झाले   जवानांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.

 

 

या अगोदर काल शोपियांमध्ये लिटर अग्लर भागात तैनात पोलीस व सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी दूर जवानांवर गोळीबार केला होता. त्याला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिलं गेलं होतं. या हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नव्हते.

 

 

Protected Content