सोने थोडे उतरले

 

मुंबई,वृत्तसंस्था । सोने आणि चांदीच्या दरात सुरु असलेली घसरण गुरुवारी देखील कायम आहे. सध्या मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजवर सोने २४ रुपयांनी कमी झाले असून त्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५१७५५ रुपये झाला आहे.

चांदीचा भाव १०९ रुपयांनी कमी झाला असून तो एक किलोला ६७४२० रुपये आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांतील घसरणीमुळे सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५० हजारांखाली आला आहे.

गुरुवारी दिल्लीत २२ कॅरेट सोने ४९८६० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५४३९० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोने ५०१८० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५२८८० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटचा भाव ४९२०० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५३७६० रुपये आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ५०४१० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५१४१० रुपये आहे. चांदीचा भाव एक किलोसाठी ६७५३० रुपये आहे.

Protected Content