सोनिया गांधी रूग्णालयात दाखल

sonia gandhi

नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोनिया गांधी आज संध्याकाळी दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हेदेखील रुग्णालयात पोहोचले असून, त्या नियमित आरोग्य तपासणीकरिता रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सोनिया गांधी रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी हॉस्पीटलमध्ये धाव घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे वृत्त आहे.

Protected Content