नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष आणि पक्षांमध्ये फेरबदल करण्यासंदर्भात पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सविस्तर पत्र लिहिले होते. यावर प्रतित्यूत्तर देतांना आपण पक्षाध्यक्ष पद सोडायला आपण तयार असून, एकत्र येऊन नवीन अध्यक्षांची निवड करा, असे सोनिया गांधी यांनी नेत्यांना म्हटले आहे.
काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष आणि पक्षांमध्ये फेरबदल करण्यासंदर्भात पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना सविस्तर पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदी कार्यक्षम व जनतेमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली असून, सोनिया गांधी यांनी पत्राला उत्तर दिले आहे. पक्षाध्यक्ष पद सोडायला आपण तयार असून, एकत्र येऊन नवीन अध्यक्षांची निवड करा, असे सोनिया गांधी यांनी नेत्यांना म्हटले आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेसच्या पाच माजी मुख्यमंत्र्यासह २३ नेत्यांनी पक्षाला नवी उभारी देण्यासाठी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. १५ दिवसांपूर्वी लिहिलेल्या पत्रात काही मुद्दे नेत्यांनी मांडले होते. या पत्राला सोनिया गांधी यांनी उत्तर दिलं आहे. “काँग्रेस कार्यकारी समितीनं १० ऑगस्टला पक्षाची सूत्रे स्वीकारण्याची विनंती केली होती. तेव्हा पुन्हा पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यात रस नसल्याचं आपण समितीला सांगितलं होतं. त्याबरोबर हंगामी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना लवकरात लवकर पक्षाध्यक्ष पदाची निवड करावी, अशी अटही घातली होती,” असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. “पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सोडायला तयार असून, एकत्र येऊन नव्या अध्यक्षांची निवड करावी,” असं सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना म्हटलं आहे.