धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सोनवद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच्या वतीने सोनवद येथे ज्येष्ठ नागरीकांसाठीच्या कोरोना लसीकरणाला सुरूवात करण्यात आली.

गेल्या दीड महिन्यापासून जळगाव कोरोनाची लस देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकुण ३० हजाराहून अधिक जणांना कोवीशिल्डची लस देण्यात आली आहे. यात शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचा अधिक समावेश आहे. धरणगाव तालुक्यातील सोनवद येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सोनवद गावातील ज्येष्ठ नागरीकांसाठी कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सोनवद गटाचे जि.प.सदस्य गोपाल चौधरी, पंचायत समिती सदस्य प्रेमराज पाटील, डॉ. गिरीश चौहाण, यांच्यासह ग्रामपंचायतचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.