सैन्यात भरती करून देण्याचे आमिष दाखवत तरूणाची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  सैन्यात कोट्यातून चालक म्हणून भरती करून देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ६ लाख १० हजार रूपयात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील अर्जुन सोपान गवळी (वय.२३) हा युवक अनेक दिवसांपासून खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत आहे. त्याचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर वडिलांच्या ओळखीचे संतोष रमेश वराडे (वय ५०, रा.भोपाळ, मध्यप्रदेश) यांनी अर्जुनला सैन्यात लावून द्या असे सांगितले. तसेच यासाठी पैसे भरावे लागतात,  तुम्ही पैसे दिले तर अर्जुनला स्पोर्टस कोट्यातून सैन्यात चालक म्हणून नोकरी मिळू शकते असे आश्वासन दिले. त्यानुसार भोपाळ येथे तुषारसिंग मलीक व साहील धडवाल यांना ४ लाख १० हजार रुपये बँक खात्यातून तर ४ लाख रोख अशी एकूण ८ लाख १० हजार रुपयांची रक्कम दिली. परंतू पैसे देवून नोकरी मिळत नसल्याने दिलेले पैसे तरूणाने मागितले. त्यापेळी २ लाख रूपय परत केले. उर्वरित ६ लाख १० हजार रूपये दिलेली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अर्जून गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी २४ जून रोजी सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी संतोष रमेश वराडे, तुषारसिंग मलीक व साहील धडवाल यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content