मुंबई (वृत्तसंस्था) आज सकाळी शेअर बाजार उघडल्यानंतर मोठी पडझड झाली होती. दुपारनंतर पुन्हा एकदा सेन्सेक्स २८०० अंकांनी कोसळल्याने अवघ्या १५ मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल सहा लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावरही पहायला मिळाला होता. आजही सकाळी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराला सुरुवात होण्यापूर्वी सेन्सेक्स १५९१.८० अंकांनी कोसळून ३२,५११.६८ अंकांवर उघडला होता. तर निफ्टी ४४६.८५ अंकांनी कोसळत ९५०८.३५ अंकांवर उघडला होता. त्यानंतर दुपारी शेअर बाजारात पुन्हा मोठी पडझड झाली. सेन्सेक्स २८०१.०७ अंकांनी कोसळत ३१,३०२.४१ वर पोहोचला. तर निफ्टी ७५७.८० अकांनी कोसळत ९१९७.४०वर पोहोचला.