सुशांत आत्महत्या प्रकरणात संजय राऊत अडथळे आणताय ; नारायण राणेंचा आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) सुशांत आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेता संजय राऊत अडथळे आणत आहेत. ते असे का करत आहेत? ते असे वागत असल्याने मला संशय येत आहे की, त्यांचाही या प्रकरणाशी काही संबंध आहे, म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

 

नारायण राणे पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या विधानावरून शंका निर्माण होत आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास दबावात करत आहे. एवढेच नव्हे तर राणे यांनी सुशांतची हत्या झाली असल्याचा पुनरोच्चार केला आहे. या प्रकरणात शिवसेना नेता संजय राऊत अडथळे आणत आहेत. ते असे का करत आहेत? ते असे वागत असल्याने मला संशय येत आहे की, त्यांचाही या प्रकरणाशी काही संबंध आहे. सुशांतला न्याय मिळावा यासाठी सीबीआय तपास होणे गरजेचे आहे. सुशांत आणि दिशा सालियान या दोन्ही प्रकरणाचा संबंध आहे. तसेच सुप्रीम कोर्टात केस गेल्याने अपेक्षा वाढल्या आहेत. तपासासाठी आलेल्या बिहार पोलिसांच्या एसपीला क्वारंटाइन करण्याची काहीच गजर नव्हती. ते मुंबईत आल्याबरोबर त्यांना अटक का करण्यात आली? या प्रकरणाची कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी हा बंदोबस्त केला होता,असा आरोप राणेंनी केला.

Protected Content