सुशांत आत्महत्या प्रकरण : …म्हणून देशाचा नागरिक म्हणून मला अत्यंत दुःख होतेय : उज्ज्वल निकम

जळगाव (प्रतिनिधी) सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दोन राज्यांचे पोलीस अशाप्रकारे विधाने करत आहेत, की जसे काही हे भारत आणि पाकिस्तानचे युद्ध आहे. अशा प्रकारच्या स्थितीमुळे या देशाचा नागरिक म्हणून मला अत्यंत दुःख होत असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

 

टीव्ही-९ सोबत बोलतांना उज्ज्वल निकम म्हणाले की, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहचले आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी कलम १७४ अन्वये चौकशी सुरु केली. या घटनेनंतर ४५ दिवसांनी सुशांतसिंहच्या वडिलांनी बिहारमधील पाटणा येथे सुशांतच्या मृत्यूबाबत काँग्निझेबल ऑफेन्सबाबत फिर्याद दाखल केली. त्यात एका अभिनेत्रीचा संशयित आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर ज्या घडामोडी घडल्या, त्या अत्यंत क्लेशदायक आहेत. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहचले. या स्थितीमुळे या देशाचा नागरिक म्हणून मला अत्यंत दुःख होत आहे, अशी उद्विग्नता उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली.

Protected Content