Home राष्ट्रीय सुशांतची हत्या झालीय ! – माजी खासदाराचा आरोप

सुशांतची हत्या झालीय ! – माजी खासदाराचा आरोप

0
24

पाटणा वृत्तसंस्था । अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली नसून याची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप माजी खासदार पप्पू यादव यांनी केला आहे.

जन अधिकार पक्षाचे नेते आणि बिहारमधील माजी खासदार पप्पू यादव यांनी सुशांतच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत हा कधीही आत्महत्या करू शकत नाही. त्याची हत्या करण्यात आली आहेफ असं पप्पू यादव यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी या घटनेची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. तर त्यांनी ट्विटच्या माध्यमातूनही यावर भाष्य केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, बिहारचा गौरव असलेला सुशांत सिंह राजपूत आत्महत्या करू शकत नाही. त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हायला हवी. पाटणातील त्याच्या घरी जाऊन सुशांतच्या वडिलांची भेट घेतली. त्यांची मागणी आहे की, याची सीबीआय चौकशी व्हायला हवी. घटनेच्या दोन तास आधी सुशांतसोबत त्यांचं बोलणं झालं होतं. आत्महत्या करण्यासारखं कोणतंही कारण नव्हतं. कुटुंबीयांना भेटून भावना विवश झालो आहे असं ट्विट पप्पू यादव यांनी केलं आहे.


Protected Content

Play sound