जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यासह राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे सुरत येथून विदर्भात जाणारे १४ जणांना ताब्यात घेवून त्यांची जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, सुरत येथून काही व्यक्ती पायीविदर्भात आज असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार अजिंठा चौफुलीवर पथक रवाना करून रणजीत परशुराम राठोड, निलेश विसावर राठोड, निखील प्रकाश चव्हाण, किशोर रामदास जाधव, निलेश जंगू पवार, राजु सुरेश राठोड, राहुल बबन मंडळ, राईदुल बारा गुलाम बारा, पोभीसेन सुनिल सेन, अविनाश पुंडलिक चव्हाण, प्रविण पुंडलिक पवार, सचिन शांताराम पवार, उमेशर प्रेम राठोड, रवी मोहन राठोड ता. दरवा जि. यवतमाळ यांना ताब्यात घेतले. वैद्यकिय तपासणीसाठी सर्वांना जिल्हा वैदयकिय महाविद्यालयात तपासणीसाठी रवाना केले.
जेवण व मास्क, सॅनिटाझरचे वाटप
शहरातील देवा तुझा मी सोनार आणि पातोंडकर ज्वेलर्सचे संचालक किरणशेठ पातोंडकर यांच्यावतीने सर्वांना मास्क व सॅनीटायझर वाटप करण्यात आले. तर श्याम चव्हाण, शेख सादिक शेख मेहबुब, इम्रान खाना अकबर खान, निजाम मुलतानी यांनी जेवणाची व्यवस्था केली. तर घुगे पाटील ट्रान्सपोर्टचे गजेंद्र झिपरू पाटील यांनी वाहन उपलब्ध करून वैद्यकिय तपासणीसाठी रवाना केले.
यांनी केली कारवाई
सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, पोकॉ इम्रान सय्यद, मुद्दस्सर काझी, सचिन पाटील, मुकेश पाटील यांनी ही कारवाई केली.