जळगाव प्रतिनिधी । आपल्या आयुष्यात एकही लढाईन न हरलेले थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनाचा प्रवासा ख्यातनाम व्याख्याते डॉ. सुमंत टेकाडे यांनी उलगडून दाखविला.
जिल्हा ब्राह्मण महासंघाच्या वतीने शहरातील कांताई सभागृहात डॉ. सुमंत टेकाडे यांचे रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे या विषयाव व्याख्यान आयोजित करण्यात आले. यात ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या कामात जीवाला जीव देणार्या लोकांची फौज उभी केली होती. त्याप्रमाणे बाजीरावांमध्ये देखील लोक निवडीचे कौशल्य होते. त्यांनी सर्वसामान्यांमधून हिर्यांची पारख करीत त्यांना पैलू पाडले. यात सर्वसामन्य मेंढपाळ मुलातून मल्हारराव होळकर, गॉल्हेरला गणोजी शिंदे, गोविंदराव खेर असे अनेक लोकांना तयार करून त्यांना उच्चपदापर्यंत पोहोचवले. याच प्रमाणे थोरल्या पेशव्यांची कारकीर्द डोळे दीपवणारी आहे. अनेकांना डावलून छत्रपती शाहूंनी २० वर्षांच्या मुलाला पेशवाई प्रदान केली. मात्र, बाजीराव पेशव्यांनी त्यांचा विश्वास सार्थ ठरवत आपल्या वेगाच्या जोरावर ३० लढाया न हारता जिंकत छत्रपतींचे स्वराज्य दिल्लीपर्यंत वाढवले. यावरून बाजीराव पेशव्यांच्या युद्धनीतीची व वेगाची कल्पना येत असल्याचे डॉ. टेकाडे म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही. पी. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. या वेळी अशोक जोशी, शैलेश कुलकर्णी, हेमलता कुलकर्णी, अजय डोहळे आदी उपस्थित होते. विशाखा देशमुख यांनी निवेदन केले.