शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथील शिंपी समाजाचे मार्गदर्शक व सेवानिवृत्त शिक्षक सुभाष त्र्यंबक शिंपी (वय ६२) यांचे हृदय विकाराचे धक्क्याने निधन झाले.
सुभाष त्र्यंबक शिंपी यांच्यावर दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार सुनिल शिंपी यांचे ते वडील होत.