जळगाव प्रतिनिधी । पूर्व वैमन्यसातून कुसुंबा टोल नाक्याजवळ दोन गटात झालेल्या गँगवॉर झाल्याची घटना रविवारी, दुपारच्या सुुमारास घडली होती. दोन्ही गटातील सात संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांची १७ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तालुक्यातील कुसूंबा येथे एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याने दोन्ही गट कुसूंबा येथे अंत्यविधीसाठी गेले होते. याठिकाणी दोन्ही गटांकडून खुन्नस दिली जात होती. दोन्ही गटात खुन्नसबाजी झाल्याने दोन्ही गट अंत्ययात्रेवरुन परतत असतांना ते कुसुंबा टोलनाक्याजवळ समोरासमोर भिडले. या मध्ये दोन्ही गटांकडून चॉपर, लोखंडी पाईप व लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आला. या घटनेत दोन्ही गटातील विशाल राजू अहिरे (२८, रा. रामेश्वर कॉलनी), किरण खर्चे (रा.२७, नितीन साहित्यानगर) व किरण गव्हाणे हे तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केल्याने दोन्ही गटातील सुमारे १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही गटातील सात जणांना अटक
दोन गट समोरासमोर भिडल्यामुळे त्यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटातील सुमारेे 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा यातील संशयित आरोपी आशू सुरेश मोरे (19, एकनाथनगर, रामेश्वर कॉलनी), दीपक लक्ष्मण तरटे (24, नागसेननगर), किरण शिवाजी गव्हाने (24, प्रविणपार्क, रामेश्वर कॉलनी), विशाल भगवान पाटील (21, मंगलपूरी, रामेश्वर कॉलनी) व छोटा किरण उर्फ किरण शामराव चितळे (22, सुप्रिम कॉलनी), आकाश दिलीप परदेशी, राकेश कैलास पाटील या सात जणांना रात्र गस्त घालणार्या पथकाने अटक केली. त्यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सातही जणांना 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली