जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातून औषधी विक्रेत्याच्या दुकानातून एकाने सीसीटीव्ही कॅमेरा चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत शुक्रवार ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आजीमुद्दीन आरिफ पटेल (वय-२९) रा. कोहिनूर चौक, सुप्रीम कॉलनी, जळगाव यांचे मेडीकल दुकान आहे. औषधी विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या दुकानात त्यांनी पंधराशे रुपये किमतीचा सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहे. याच परिसरात राहणारा तय्यब इम्रान पटेल (वय-२९) याने दीड हजार रूपये किंमतीचा सीसीटीव्ही कॅमेरा हा चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अजीमुद्दीन आरिफ पटेल यांनी शुक्रवार ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी तय्यब इम्रान पटेल (वय-२९) रा. सुप्रीम कॉलनी याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील करीत आहे.