चाळीसगाव प्रतिनिधी । देवळी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या कार्यालयाचे व्यवस्थापक सुनील रणदिवे-पाटील यांनी आज वाढदिवसाच्या निमित्ताने मरणोत्तर अवयवदान करण्याचा संकल्प केला असून खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते त्यांना याबाबतचे पत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी खासदार उन्मेषदादा पाटील, पद्माकर रणदिवे, वसुंधरा फाऊंडेशनचे संस्थापक सचिन पवार यांच्या हस्ते देहदान ओळखपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जैन, समाजसेवक पप्पू राजपूत, बेलदारवाडी उपसरपंच ज्ञानेश्वर कुमावत, उंबरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते लियाकत पठाण, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर साबळे,जेष्ठ कार्यकर्ते बंडू पगार, भरत गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.