जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सुनसगाव येथील प्रौढाने खळ्यातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, भानूदास हरी कंखरे (वय-४०) रा. सुनसगाव ता.जि.जळगाव हे शेतमजूर आहे. मिळेल ती मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतीचे कामासाठी त्याचे गावाच्या बाहेर गुरांचा गोठा आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गुरांचे शेणपाणी करण्यासाठी गेले. खळ्यातील एका झाडा दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी मुलगा मनोज आणि दिनेश हे खळ्यात गेले असता वडीलांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधून घटनेची माहिती मिळाली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी छाया, मनोज आणि दिनेश दोन मुले असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पो.ना. सुनिल सोनार, सिध्द्दाधंद ढवळे करीत आहे.