रावेर प्रतिनिधी । सुकी मध्यम प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कामांची माहिती देण्यास जलसंपदाचे उपकार्यकारी अभियंता टाळाटाळ करीत असल्याने या कामाची गुणवत्तेवर प्रश्नचिन्हा उपस्थित होत आहे. सुरू असलेल्या २५ लाखांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा संशय होत आहे.
सुकी मध्यम प्रकल्प देखभाल दुरुस्तीचे कामे सुरु असून यामध्ये दुरुस्ती, काँक्रीटीकरण, डाव्या-उजव्या कालव्याची पाटचाऱ्याच्या साफसफाई आदी कामे सुरु असून हे कामे येथील उपविभागीय अभियंता यांच्या मर्जीतील ठेकेदार आहे. सुरु असलेले कामांना कोणतीही गुणवत्ता नसून मार्च अखेरचे बिल काढण्याच्या घाईघाईत थातूरमातूर काम केले जात आहे. या मध्यम प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता कामांची माहिती दडपत असल्यामुळे कामात भ्रष्टाचार होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कामांकडे जलसंपदा विभागाचे कार्याकारी अभियंता यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बेरोजगारांचे कामे होताय जेसीबीने
आधीच तालुक्यात भीषण बेरोजागारी असून युवकांच्या हाताला कामे नसताना लाखो रूपयांची कामे मध्यम प्रकल्प जेसीबीच्या साहाय्याने करत आहे. आधी शासन युवकांना रोजगार देण्यासाठी देण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवून रोजगार देण्याचा प्रयत्न करत असतांना दुसरीकडे हेच अधिकारी आपल्या मर्जीतले ठेकेदाराने हरताळ फासले आहे.