Home Cities अमळनेर सीसीटीव्ही कॅमेरे व केबलची चोरी

सीसीटीव्ही कॅमेरे व केबलची चोरी


अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील गांधीपुरा भागात राहणाऱ्या एका तरुणाच्या दुकानातून ७५ हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे व केबल असा मुद्देमाल चोरून गेला आहे. याबाबत शुक्रवार १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अमळनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आबिद शेख मोहम्मद शफी (वय-३८) रा. झामी चौक, अमळनेर हा आपल्या परिवारासह राहतो. ८ मार्च रोजी रात्री ८ ते ९ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गांधीपुरा भागातील एका दुकानात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे व ऑप्टिकल फायबर केबल असा एकूण ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. हा प्रकार घडल्यानंतर आबिद शेख मोहम्मद शफी याने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर शुक्रवार १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कैलास पवार करीत आहे.


Protected Content

Play sound