पाचोऱ्यात उद्या संदल-ए-मुबारक

पाचोरालाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |    पाचोरा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्टॅण्ड रोडवरील मानसिंगका फॅक्टरी मधील हिंदु – मुस्लिम एकतेचे प्रतिक मानले जाणाऱ्या पीर सैय्यद गयबान शहावली या दर्गेवर दि. १२ मार्च रोजी “संदल ए मुबारक” उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या जश्ने संदल, पीरबाबा गयबान शहावली दर्शन (जिरायत) व सकाळी ११ वाजेपासून सुरु होणाऱ्या महाप्रसादाचा परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पाचोरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे पोलिस हेड कॉन्स्टेबल शकील शेख व पोलिस बाॅईज असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष नदीम शकील शेख यांनी केले आहे.

Protected Content