मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने आज देशभर इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केले आहेत.
सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर cbseresult.nic.in वर निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांनी यंदा सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा दिली होती. 91.46% विद्यार्थी यंदा पास झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत हा थोड्या फरकाने वाढला आहे. यावर्षी मेरिट लिस्ट जाहीर न करण्याचा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला आहे. दरम्यान, सीबीएसई दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १८,८९,८७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात ७,८८,१९५ विद्यार्थीनी आणि ११,०१६६४ विद्यार्थी होते तर १९ ट्रान्सजेंडर होते.