सीएए विरोधात भाषण ; डॉक्टर काफील खानला अटक

dr.kafeel khan

मुंबई (वृत्तसंस्था) सुधारित नागरिकत्व विधेयकाविरोधात (सीएए) भाषण केल्याप्रकरणी डॉक्टर काफील खान यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भाषणात प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

 

उत्तर प्रदेशातील अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये प्रक्षोभक भाषण दिल्याच्या आरोपाखाली गोरखपूरमधील डॉक्टर काफील खान यांना अटक करण्यात आली. बुधवारी रात्री मुंबई विमातळावर उत्तर प्रदेश एसआयटीकडून मुंबई पोलिसांच्या मदतीने अटकेची कारवाई करण्यात आली. कफील खान यांनी भाषण करताना म्हटले होते की, मोटा भाई देशात प्रत्येकाला हिंदू किंवा मुस्लिम कसे व्हावे हे शिकवत आहेत, पण माणूस म्हणून कसे जगावे हे नाही. सीएए मुस्लिमांना द्वितीय श्रेणीचे नागरिक करत असून नंतर त्यांना एनआरसीच्या माध्यमातून त्रास दिला जाईल. डॉक्टर कफील खान यांच्या या भाषणानंतर १३ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

Protected Content